नवी दिल्ली | राऊत काहीही बोलतात असं म्हणता? अरे तुम्ही काय बोलता? काल त्यांचं विधान होतं नखं कापून शहीद होता येत नाही. तुम्ही काय Xपटलं. तुम्ही काय कापलं सांगा? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना केला.
देशासाठी तुमचं काय बलिदान आणि योगदान आहे? उलट ज्यांचं योगदान आहे, त्या बलिदानाचा लिलाव करता या महाराष्ट्रात? असा सवालही संजय राऊत यांनी फडणवीसांना केला.
कधी राम मंदिराच्या नावाने तर कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले. आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान आहे. त्याचा लिलाव करता आणि त्या भ्रष्ट गुन्हेगाराचाी बाजू घेता? तुम्ही नेहमी अभ्यास करून बोलता असा दावा करता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार झाला नाही? आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? तुमचंच राजभवन आहे. आमचे नाही. तिथे तुमचेच आदेश पाळले जातात, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.
आयएनएस विक्रांत भंगारात जरी घालवली असली तरी हे फालतू पुढारी आणि त्यांचे पक्ष अरबी समु्रदात बुडवल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आज महाराष्ट्रात या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशद्रोहींना तुरुंगात टाकू. देशभक्तीचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवलं आहे. तुमचे मुखवटे गळून पडले आहेत. हे एक लहानसं प्रकरण आहे. अजून आणखी प्रकरण काढू, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत”
“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार”
खळबळजनक! ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप
महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल!
राज ठाकरेंना धक्का?, हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?