“आम्ही तुरुंगात गेलो तर त्याच कोठडीत तुम्हालाही घातल्याशिवाय राहणार नाही, कारण…”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप तसेच ईडीवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांना अडकवण्यासाठी, तुरुंगात डांबण्यासाठी ईडी काम करतंय. अशा एजन्सीच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही एफआयआर दाखल करणार आहोत, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

ईडीचे अधिकारी वसुलीचं काम करतात. त्यांचे एजंट बाहेर फिरतात. मुंबई पोलिसांनी ईडीची चौकशी करावी. ईडीचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत दादागिरी चालणार नाही. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

सरकार पाडण्यासाठी ईडीच्या मार्फत आम्हाला तुरुंगात घालण्याचा डाव आखत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आम्ही तुरुंगात गेलो तर त्याच कोठडीत तुम्हाला घातल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमचे गुन्हे आमच्यापेक्षा काळे आहात. तुमची पाप जास्त आहेत. आम्ही स्वच्छ आहोत, असं राऊत म्हणाले

अनिल देशमुखांच्या शेजारील कोठडीत जावं लागेल असं भाजप नेते वारंवार सांगत आहे. मी त्यांना सांगतो, तुम्हाला देखील तिथेच जावं लागेल. तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. सरकार पडत नाही म्हटल्यावर आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता जास्त बोलत नाही. ईडीला कायदेशीरपणे कारवाई करायची आहे तर त्यांनी करावी, असं ते म्हणाले.

ईडीच्या कार्यालयात काय चाललंय? याचं सूत्रधार कोण आहेत? हे लवकरच मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच तुम्ही मुंबईत दादागिरी करता, महाराष्ट्रातील लोकांना बाहेरची लोकं सुपाऱ्या घेऊन येतात. 12-12 तास डांबून ठेवतात. धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी असं माझं आवाहन आहे, असं संजय राऊत म्हणाले.

निष्पाप मुंबईकरांचा ईडीकडून छळ सुरु आहे. लवकरच ईडी कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेणार आहे. ईडीचे अधिकारी मविआ नेत्यांना घोटाळ्यात अडकवण्यासाठी कंत्राटदारांना गन पाईंटवर आमची नावं घेण्यासाठी धमकावत आहेत. भाजपचे नेते ईडीच्या कार्यालयात बसून असतात. मी लवकरच त्यांची नावं जाहीर करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

माझ्या मुलीच्या लग्नातील फूलवाल्याला उचलून आणतात. किती रुपये मिळाले असं त्याला विचारतात. त्याने पैसे नाही घेतले तर त्याला प्रश्न विचारले जातात. माझ्या घरातलं लग्न आहे. लोकांना उचलून गन पॉइंटवर त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. अंदर डाल दूंगा तुमको, असं धमकावलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही” 

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ आजाराचा धोका, अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच मिळणार ‘ही’ मोठी भेट! 

“लता मंगेशकर हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी होत्या म्हणून…”