“अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार”

मुंबई | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बाप बेटे तुरुंगात जाणार असल्याचा ट्विटद्वारे पुनरुच्चार केलाय. सोमय्या बाप बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या आरोपानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावली झाली. या सुनावणीवेळी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यवरून राऊतांनी किरीट सोमय्यांना डिवचलं आहे.

आग लगाने वालों का कहाँ खबर रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे, असं ट्विट करताना सोमय्या बाप बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही” 

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; ‘या’ तारखेपासून सुट्ट्या सुरू

अत्यंत धक्कादायक! सुंदर बायकोवर कोणाची नजर पडू नये म्हणून नवऱ्याने केलं भयानक कृत्य

“केंद्र सरकारला लाज वाटत असेल तर…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…