“अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत”

मुंबई | पाच राज्याच्या निवडणुकीत सरकारने जनतेला एप्रिल फुल केलं आहे. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील म्हणून लोक गेल्या 7 वर्षापासून वाट बघतायेत, पण हे एप्रिल फुल असल्याचं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

एप्रिल फुल हा गंमतीचा विषय राहिला नसून, हा जनतेच्या जगण्या मरण्याचा प्रश्न झाला आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे, थापा मारणं, फसवा फसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले असल्याचे राऊत म्हणाले.

अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील याची लोक 7 वर्षापासून वाट बघतायेत असंही राऊत म्हणाले.

2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच, पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानमध्ये येणार हे एप्रिल फुलच आहे. महाराष्ट्र किंवा देशात सुडाचं राजकारण करत नाही असे सांगणं हे एप्रिल फुलच असल्याचं राऊत म्हणाले.

सतीश उके यांचे काही अपराध असतील, त्यांनी व्यवहार चुकीचे केले असतील, जमीन बळकावली असेल, धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने येऊन तपास करावा, कारवाई करावी असा गुन्हा नसल्याचं राऊत म्हणाले.

नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, त्यांनी कुणाला धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाहीये, असं ते म्हणालेत.

कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करतात. हा राज्यांतील पोलिसांचा सरळ सरळ अतिक्रमण आहे. मी म्हणतो ना उकेनी गुन्हा केला असेल तर भादंविनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी” 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले… 

ग्राहकांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

“यशस्वी व्हायचं असेल तर त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल” 

कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय!