महाराष्ट्र मुंबई

रोज पत्रकार परिषदा घेताय पण लोकांच्या मुखापर्यंत पॅकेज पोहचेल तो दिवस खरा- संजय राऊत

मुंबई |   कोरोनाच्या विळख्यातून आपल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दररोद पत्रकार परिषदा घेऊन कोणत्या क्षेत्रासाठी किती निधी देणार आहे किंवा कोणत्या क्षेत्रांना या पॅकेजमधून दिलासा मिळणार आहे, याबाबतची माहिती देत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या पॅकेजवर खोचक टिप्पणी केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाताई रोज पत्रकार परिषदा घेऊन याला किंवा त्याला पॅकेज देण्याच्या घोषणा करीत आहेत. ते पॅकेज लोकांच्या मुखापर्यंत पोहोचेल तो दिवस खरा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी भाजप आणि सीतारामन यांच्यावर टीका केली आहे.

स्थलांतरित मजुरांच्या पायांच्या चिंध्या झाल्या आहेत. राहुल गांधी हे दिल्लीच्या रस्त्यांवर त्या मजुरांसोबत थांबले, थोडा वेळ बसले आणि बोलले. यावर निर्मलाताईंना अत्यंत दु:ख व्हावे हे आक्रितच म्हणावे लागेल. कुणी श्रमिकांचे दु:ख हलके करीत असेल तर सरकारला त्याचा आनंद व्हायला हवा, पण इथे उलटेच सुरू आहे, असं ते म्हणाले आहेत.

मंत्री लॉक डाऊन कुरवाळत बसले आहेत. मजूर लॉक डाऊन तोडून कच्च्या-बच्च्यांसह रस्ते तुडवत निघाले आहेत. त्या रस्त्यांवर विरोधी पक्षाचा एक नेता गांधी नावास जागून मजुरांना कवटाळत उभा राहिला याचे ज्यांना दु:ख होते त्यांनी यापुढे माणुसकी व परंपरेच्या गप्पा मारू नयेत. आपल्याच लोकांना राज्यात घ्यायला त्यांचा विरोध आहे व मजुरांचे दु:ख विचारणार्‍यांचा द्वेष आहे. कोरोनाने नवे कलियुग आणले आहे खरे, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबई-पुण्यामधून गावी जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती, म्हणाले…

-‘अप्सरा सोनाली’ने दिले आनंदवार्ता… दुबईत पार पडला साखरपुडा!

-मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

-दिलदार रिक्षावाला! लग्नासाठी जमवलेली रक्कम मजूरांच्या जेवणासाठी करतोय खर्च

-हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार??; देवेंद्र फडणवीसांचा सवाल