मुंबई | मलाडमधील क्रिडा संकुलाच्या नावावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. भाजपने (Bjp) टिपू सुलतान (Tipu Sultan) नावाला जोरदार विरोध दर्शवत आक्रमक आंदोलन केलंय. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. टिपू सुलतानचं काय करायचं ते आम्ही पाहू. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे, अशी बोचरी टीका राऊतांनी भाजपवर केलीये.
टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हे सर्व आम्हाला माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही, असं राऊत म्हणालेत.
टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं संजय राऊतांनी म्हटलंय.
राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असा हल्लाबोल संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
राजीनाम्याची गोष्ट आहे ना मग तुम्ही राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा मागणार आहात का? कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन या टिपू सुलतानचं सर्वात जास्त गुणगान राष्ट्रपती कोविंद यांनी गायलं होतं. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सैनिक वगैरे वगैरे या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. लावल्या ना? मग त्यांचा राजीनामा आधी मागावा आणि इथे काय करायचं मुंबईत त्यासाठी महापालिका आणि सरकार समर्थ आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
तुम्ही काळजी करू नका. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करू नका, असा दमच राऊत यांनी भाजपला भरला.
महत्वाच्या बातम्या-
“…तर राज्य सरकार चालवायची जबाबदारीही केंद्राकडेच द्या”
‘माझ्या ब्रा ची साईज देव…’; अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य
‘आज काळीज फाटलं’; आमदार विजय रहांगडालेंची लेकासाठी भावूक पोस्ट
‘या’ अभिनेत्रीने शॉवर घेतानाचा व्हिडीओ केला शेअर, सोशल मीडियात धुमाकूळ
सावधान! लस न घेतलेल्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर