मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
ईडी, सीबीआय आणि एनसीबी ज्याप्रकारे काम करीत आहेत ते पाहता देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय, असा प्रश्न पडत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शातील अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण मोदी यांच्या सरकारने केले. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्यात आल्या. दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात अशी टवाळी त्यावर सुरू आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.
महाराष्ट्रात याला तुरुंगात टाकू व त्यालाही तुरुंगात टाकू, असे भाजपचे नेते रोज सकाळी उठून सांगतात. तेव्हा देशातील तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय? असा प्रश्न पडतो, असंही ते म्हणालेत.
मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते. 2024 पर्यंत हे सहन करावेच लागेल. संपूर्ण देशच हळूहळू तुरुंग होताना दिसत असल्याची बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सने सात वेळा देशमुख यांच्या घरावर धाडी घातल्या. देशमुख आता ईडी कार्यालयात गेले व त्यांना अटक केली. ज्या अधिकाऱ्यांवर खून, खंडणी, भ्रष्टाचाराचे गुन्हे मुंबई पोलिसांनीच दाखल केले, त्यांच्या हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढच्या चोवीस तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर एक प्रतिपादन देतात की, अनिल देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्याने आरोपच नाकारले, असंही ते म्हणाले.
अनिल देशमुखांना अटक व त्याआधी यथेच्छ बदनामी केली. देशमुख हे कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत व भाजप त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा व विकृत तानाशाही आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत तेच घडले. आर्यन खान याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ‘ड्रग्ज’ सापडले नाही. तरीही प्रसिद्धी, पैसा व भाजपचा दबाव यामुळेच त्याला अटक झाली, असं सांगत त्यांनी भाजपवर टीका केलीये.
26 दिवस आर्यन व त्याचे मित्र तुरुंगात राहिले. पुन्हा हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मागे भारतीय जनता पक्ष टाळ्या पिटत उभा राहिला. हे रोगट मानसिकतेचं लक्षण आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
राकेश झुनझुनवाला यांनी सर्वांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
“तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नाहीतर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं”
भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट, ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट?
…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ
‘हा देश कोरोना संसर्गाचं केंद्र ठरेल’; WHO ने दिला गंभीर इशारा