मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद वाढला आहे. या पाच वर्षात देशातील काळा पैसे वाढला. यामुळे नोटाबंदी पूर्ण अपयशी ठरली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपची भूमिका समजू शकतो. महाराष्ट्रात प्रयत्न करूनही भाजपला आघाडीचा बालही बाका करता आला नाही, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
इतकं मोठं राज्य, केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव आणि पैसा याचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक आहे, असा टोला संजय राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकार उखडून फेका असं आवाहन केलं आहे. नड्डा यांच्या आवाहनाची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.
जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. त्याच्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन जे घुसलं आहे आणि चीनने आपल्या हद्दीत गावं बसवली आहेत. नड्डांनी सर्वात आधी अरुणाचलप्रदेशातून चीनला उखडून फेकलं पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी नड्डांना दिला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढले आहेत. अतिरेक्यांचे अड्डे वाढले आहेत. त्यांना ताबडतोब उखडून फेकलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
राजकारणात लोकशाहीत एखादं सरकार लोकशाही मार्गाने हटवण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर सीमेवर जी लोकं घुसली आहेत आणि गावंच्या गावं बसवली आहेत, चीनने त्यांना उखडण्यासाठी काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घ्यायला उत्सुक आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी नड्डांना लगावला.
दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून झालं की मग भाजपने पूर्णपणे महाराष्ट्राकडे वळावं आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी, असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘क्रांती रेडकरची बहीण….’; नवाब मलिकांचा आणखी एक गंभीर आरोप
मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी
“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा”
येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा
25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!