“ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, वरिष्ठांनी हे थांबवलं पाहिजे”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोपांची मालिकाच लावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मलिकांना सुनावलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मलिकांनी भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आता तर मलिकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केलीय. यावर बोलताना संजय राऊत यांनी नवाब मलिकांनी आता थांबलं पाहिजे, असं म्हटलं आहे. ते दिल्ली माध्यामांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

कुणाबरोबर फोटो असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही. 20 वर्षापूर्वीची व्यक्ती आज वेगळी असते. गुंड पुंड भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये स्वच्छ होतो, असं म्हणत राऊतांनी भाजपवर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

निवडणुकीच्या राजकारणासाठी राजकारण कोणत्या थराला गेलेय? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणी तरी कर्त्या नेत्याने हस्तक्षेप केला पाहिजे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.

खूप प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. नवाब मलिक यांचे हल्ले जोरदार आहेत. एका चिडीतून ते करत आहेत. मी राज्यपालांना भेटलो. त्यांच्याशी यावरही चर्चा केली पाहिजे. तसेच समेट घडवला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

एकीकडे संजय राऊतांनी नवाब मलिकांना थांबवण्याचं आवाहन केलंय तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवाब मलिकांचं कौतुक केल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं गुड गोईंग अशा शब्दात कौतुक केल्याची माहिती आहे. कालच नावब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस इतरांवर अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप करत आहेत. मात्र,अंडरवर्ल्डचे लोक, ज्यांचे संबंध आहेत, गुन्हेगार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्या लोकांना सरकारी कमिशन आणि बोर्डांचं अध्यक्ष का बनवलं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

मुन्ना यादव नावाचा व्यक्ती नागपूरचा गुंड आहे. तो आपला राजकीय दबाव करणारा साथीदार आहे. त्याला आपण कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही. मुन्ना यादव तुमच्या गंगेत पवित्र झाला होता की नव्हता?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान, मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिकांच्या आरोपाला तात्काळ उत्तर दिलं आहे. यासाठी फडणवीस यांनी नोबल पुरस्कार विजेते जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या एका सुविचाराचा आधार घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 पोस्टाची बंपर योजना; 10 हजारांची बचत करुन ‘इतके’ लाख मिळवा

‘…हे आधी तुम्ही सिद्ध करा’; मुंबई उच्च न्यायालयाचा ज्ञानदेव वानखेडेंना झटका

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’