गोवा | काही महिन्यांपूर्वी राज्यात ईडीच्या तपासाने राजकारणात धुमाकूळ घातला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती.
ईडीच्या कारवाईवरून भाजप आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष सुरू होता. आता हाच संघर्ष आणखी वाढणार असल्याचं दिसतंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे आता संजय राऊत आक्रमक झाले आहेत. गोवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संजय राऊत गोव्यात आहेत.
गोव्यात निवडणुकीच्या तयारीत असतानाच आता संजय राऊतांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. सरकारवर आरोप करणारे उकिरड्यावरचे कुत्रे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
माझ्या कुटुंबावर आता कारवाई सुरू आहे. ती त्यांनी चालू ठेवावी. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करायचंय, असंही राऊत म्हणाले आहेत.
खोट्या केसेस करायच्या. बायका-मुलांना छळायचं. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत. तुमचं हे राजकारण तुम्हाला लखलाभ लाभो, असंही ते म्हणाले आहेत.
तुम्हाला कधीतरी सत्तेतून जायचं आहे, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. मला मुंबईत येऊ द्या, मी पाहातो काय करायचं ते, असं म्हणत संजय राऊतांनी दंड थोपटल्याचं पहायला मिळतंय.
मला असं वाटत नाही की त्यांची मुलं तुरुंगात जावीत. त्यांच्या बायका-मुलांवर आरोप व्हावेत, असं म्हणत त्यांनी यावेळी खोचक इशारा दिलाय.
भाजपनं स्वत:चा आत्मा तपासून घ्यायला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी स्थापन केलेला पक्ष हाच आहे का?, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
“देशात पाॅर्न इंडस्ट्री बनू नये, तुम्ही मला बोल्ड म्हणत असाल तर…”
शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो…’हे’ काम करा नाहीतर डीमॅट अकाऊंट बंद होईल
रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाचा ‘हा’ मॅच विनर फिटनेसमुळे अडचणीत
आमदार नितेश राणेंची अचानक तब्येत बिघडली, वकिलांची धावपळ सुरू
“तोंड सांभाळून बोललं पाहिजे”, चंद्रकांत पाटलांचं मलिकांना सणसणीत प्रत्युत्तर