मुंबई | आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsing Koshyari) यांनी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईबद्दल (Mumbai) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चा आणि टीकांचा पाऊस सुरु झाला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात मुंबईबद्दल वक्तव्य केलं. मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातून (Thane) जर गुजराती आणि राजस्थानी लोक गेले तर मुंबईत पैसा राहणार नाही आणि जी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तिचा तो दर्जाही रहाणार नाही, असं ते म्हणालेत.
शिवसेनेेचे खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांच्या गटावर जोरदार टीका केली आहे. 50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसले आहेत? असा त्यांनी प्रश्न केला आहे.
संजय राऊत यांनी याबाबत चार ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी 40 आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाब विचारला आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये राऊत म्हणालेत. महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत सरकार येताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरु झाला. स्वाभिमान आणि अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे एकूणही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचं नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. ऐका.. ऐका, असं राऊत म्हणाले असून त्यांनी त्यात राज्यपालांच्या भाषणाचा व्हिडीओ सुद्धा टाकला केला आहे.
दुसरं ट्विट करत त्यांनी शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या सुप्रसिद्ध डॉयलॉगचा वापर करत बंडखोरांवर टीका केली आहे. काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी आणि आता 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपून बसले आहेत, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.
थोडक्यात काय तर महाराष्ट्र आणि मराठी माणूस भिकारडा आहे. 105 हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई (Moraraji Desai) यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकताय ना, की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर अगोदर राज्यपालांचा राजीनामा मागा, असं त्यांनी आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आता तरी ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले? याचा खुलासा भाजप राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच ऊठावं लागेल, असं ते म्हणाले आहेत.
राज्यपालांनी या वक्तव्यातून मराठी माणसाचा आणि मुंबईचा अपमान केला आहे. असे एकंदरीत संजय राऊत यांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. तसेच त्यांनी मुंबई आणि मराठी माणसाला ऊठून आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या –