मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत नेहमी विरोधकांवर टीकेच्या फैरी झाडताना दिसतात. तर अनेकदा संजय राऊत त्यांच्याच मित्र पक्षांवर देखील हल्लाबोल करताना दिसले आहेत.
काही दिवसांपूर्वी बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणावरून संजय राऊतांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 38 लोकांनी बेंगळुरू येथील घटनेचा निषेध केला. निषेध करणाऱ्या या लोकांविरोधात कर्नाटक सरकारने कारवाईचा बडगा उचलला. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी कर्नाटक सरकारने सुरू केली आहे.
या 38 जणांवर होत असलेल्या कारवाई विरोधात खासदार संजय राऊत यांनी आवाज उठवला आहे. महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे म्हणत संजय राऊतांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
‘महारष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. मुंबईत बसून उगाच हवेत गोळीबार करू नये. त्यांनी हे खरमरीत पत्र वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडू नये’, अशा कानपिचक्या संजय राऊतांनी दिल्या आहेत.
खरमरीत पत्र लिहून काही होत नाही. एक तर तुम्ही महाराष्ट्रात कठोर पावलं उचला आणि त्या 38 तरूणांना बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील द्या, अशी मागणी संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.
या आंदोलनातला एक कार्यकर्ता म्हणून माझी ही मागणी असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, बेळगावमध्ये आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तुरूंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, अशी खंत देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवली.
छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याच्या विंटबनाविरोधात लोक रस्त्यावर उतरले. मात्र, याच लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने संजय राऊतांनी आक्रमक भूमीका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला जेवण दिलं नाही म्हणून वेटर सोबत केलं धक्कादायक कृत्य
तुम्ही पण प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण जेवता का?, मग ही बातमी एकदा वाचाच
‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’, ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांची MPSCला विनंती
“नितेश राणे हरवला आहे, शोधणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस”
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू