Top news महाराष्ट्र मुंबई

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना संजय राऊत यांचा सल्ला, म्हणाले…

मुंबई |  जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडन हॉम यांनीही ‘लॉक डाऊन शिथिल झाल्यावर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढेल,’ अशी ‘भविष्यवाणी’ वर्तवली आहे. मुळात दीड-दोन महिन्यांच्या अनुभवानंतर कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव याबाबत जगभरातीलच जनता पुरेशी ‘सज्ञान’ झाली आहे. त्यामुळे लॉक डाऊन शिथिल झाल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढेल हे सांगण्यासाठी ज्योतिषी किंवा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कशाला हवेत?, असा संतप्त सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

लॉकडाऊन उघडल्यावर कोरोना वाढेल, असं भाकित करून जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी काय विशेष सांगितले? सामान्य माणसालाही आता या धोक्याची जाणीव झाली आहे. तेव्हा त्यांच्या भीतीत भर घालण्याऐवजी ती दूर कशी करता येईल याकडे लक्ष द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटना तसंचआरोग्यावर भाष्य करणाऱ्या विविध संख्या संघटना ह्या कोरोनाच्या काळात विविध आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत. तसंच अहवाल सादर करून अनेक इशारे देखील देत आहेत. या आकड्यांमुळे सामान्य माणसावर परिणाम होऊन तो घाबरून जातो आहे. तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे आता थांबवा, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

कोरोना संकटाने सामान्य माणसाला यापद्धतीने सर्व बाजूंनी घेरले आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्याची धडपड सरकारे आणि इतर यंत्रणा करीत आहेत. अशावेळी तुमचे हे भीतीदायक अहवाल सामान्य माणसाचा कोरोनाच्या चक्रव्युहात अडकलेला ‘अभिमन्यू’ करणार असतील तर कसे व्हायचे?, असं म्णहत हे सगळेच अहवाल आणि त्यांचे निष्कर्ष काळाच्या कसोटीवर टिकतातच असे नाही, असंही सांगायला राूत विसरले नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

-ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

-केंद्रावर टीका करण्याआधी तुमच्या तिजोरीतून महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा; चंद्रकांतदादा भडकले

-निर्मलाआक्का, इथं संवेदना अन् माणुसकी व्यक्त होते; आव्हाडांकडून सीतारामन यांचा समाचार

-बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’

-उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरूणांनी फायदा घ्यावा, सरकार आपल्या पाठीशी- उद्योगमंत्री