कोल्हापूर | राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये नेहमीच कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळतं. विविध मुद्द्यांवरुन राजकीय वारातवरण तापलेलं असतं.
भाजप नेते नितेश राणे यांनी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता पुन्हा वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आग लावण्याचं काम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी याआगोदर ठाकरेंचं घर फोडलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडण लावण्यामध्ये जे काही व्यक्ती पुढे होते त्यात संजय राऊत होते, असं नितेश राणे म्हणाले.
सोमवारी सायंकाळी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
घरं फोडायची कशी याचा चांगला इतिहास संजय राऊतांचा आहे. हे काय त्यांच्यासाठी नवं नाही, असा हल्लाबोलही राणेंनी यावेळी केला.
हा काल ठाकरेंच्या घरात आग लावत होता आज छत्रपतींच्या घरापर्यंत पोहचण्याची याची मजल गेलीय.
महत्त्वाच्या बातम्या –
“विभास साठेंचा ‘मनसुख हिरेण’ होऊ नये”; किरीट सोमय्या आक्रमक
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले…
आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडेंना मोठा धक्का, महाराष्ट्राबाहेर बदली
Petrol Diesel संदर्भात महत्त्वाची बातमी, पेट्रोल पंप चालकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी