“कुवत नसली की अनेकांना सह्याद्री टेकाडा सारखा दिसतो- संजय राऊत

मुंबई | महाविकास आघाडीकडे बहुमताचा आकडा नाही म्हणणाऱ्यांना  शिववसेनेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री ‘टेकाडा’ सारखा दिसतो तसेच हे बहुमताच्या बाबतीत झालं, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीवेळी नियमांवर बोट ठेवत सभात्याग केला होता. या सर्व घडामोडींवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारचे बहुमत काठावरचे नाही, तर चांगले दणदणीत आहे. सरकारच्या बाजूने 170 आमदारांचं बळ आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतोच, पण फडणवीस यांच्या पाळीव पिलावळीच्या चष्म्यांतून आकडा 130च्या वर जायला तयार नव्हता, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

दरम्यान, वास्तविक महाराष्ट्राच्या जनतेला फडणवीस नकोच होते, असा घणाघातही शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-