“पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, पत्रकार परिषद संपताना राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई | शिवसेने नेते संजय राऊत यांनी बहूचर्चित पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ईडीनं आम्हाला त्रास दिल्याचा एकंदरीत सुर राऊत यांच्या पत्रकार परिषदेत होता. परिणामी आता राज्यात भाजप आणि शिवसेनेतील वाद वाढण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीला हाताशी धरून उगाच आमच्यावर आरोप केले आहेत. माझ्या गावातील लोकांना, माझ्या मित्रांना ईडीचे अधिकारी त्रास देत आहेत, असे आरोप राऊत यांनी केले आहेत.

पीएमसी बॅंक घोटाळ्याचे पैसे हे भाजप नेत्यांच्या प्रकल्पात लागले आहेत. फडणवीसांच्या वरदहस्तानं हे सर्व सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस, हरियाणातील दुधवाला, असं एक-एक करत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

पत्रकार परिषदेची ही सुरूवात शिवसेना भवनातून झाली आहे. शेवट मात्र ईडीच्या कार्यालयासमोर होणार, असा निर्धार यावेळी राऊत यांनी व्यक्त केला आहे. पुढील काळात परत पत्रकार परिषद घेताना ते व्हिडीओ घेऊन येणार, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. भाजपकडून आशिष शेलार, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका करायला सुरूवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला