Sanjay Raut: “आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो”; संजय राऊत कडाडले

मुंबई | राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी कारवाई सक्तवसूली संचनालयाकडून महाराष्ट्रात आज करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असल्याची माहिती होती. आता प्रत्यक्षात ईडीनं कारवाई केली आहे.

राऊतांच्या अलिबागमधील प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली आहे. परिणामी राज्यात मोठा राजकीय वाद उद्भवला आहे. शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका होत आहे.

मला पुर्ण कल्पना होती की, ईडी माझ्यावर कारवाई करणार आहे. आम्ही ज्या प्रकारे सरकार स्थापन केलं त्यावरून हे सर्व सुरू आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

मी ईडीच्या कारवाईबद्दल उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना पत्र ही लिहिले आहे. त्यामध्ये ईडी सुडाचे राजकारण करत आहे असा उल्लेख देखील त्या पत्रात करण्यात आला आहे.

मला कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. मी किंवा शिवसेना खचले असं वाटेल पण असल्या सुडाच्या कारवाया आणि असत्यासमोर आम्ही गुडघे टेकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्ही सर्वजण खंबीर आहोत. मराठी शब्दात बोलायचं झालं तर आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, असं राऊत म्हणाले आहेत. काय कराल बंदूक लावाल ना, मला माॅर्निंग वाॅकला गेल्यावर माराल ना, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांची संपत्ती तप्त केल्यानंतर राज्यात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष निर्माण झाला आहे. ईडीकडून राज्यात मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sanjay Raut: संजय राऊतांनंतर नंबर कुणाचा?, निलेश राणे म्हणाले ‘उद्धव ठाकरेंचा’

Sanjay Raut: “आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन”

IPL मध्ये अंडरटेकरची एन्ट्री! अय्यरने थेट गळाच पकडला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर

  “शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार भाजपच्या संपर्कात”