नागपूर | महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये विविध कारणांवरून राज्यात मोठा राजकीय सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईपासून ते भाजपच्या नेत्यांच्या हेरगिरीपर्यंत राजकारणात चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
संजय राऊत शिवसेनेच्या जनसंपर्क अभियानासाठी नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना महापालिकेत सर्व जागा लढवणार असं म्हटलं आहे.
भाजपच्या महापालिकेतील सत्तेला सुरूंग लावण्यासाठी शिवसेना तयार असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. सध्या नागपूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सरकार पडण्यासंदर्भात अनेक वक्तव्य करण्यात आली आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात, सरकार पडणार पडणार…अन् बेडवरून खाली पडतात, अशी भाजपची अवस्था आहे. राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
फडणवीसांनी आता स्वप्नरंजनातून बाहेर पडायला हवं, सरकारला आता अडीच वर्ष झाली आहेत. अडीच वर्षाचा कालावधी गेला पुढील अडीच वर्षही जातील, असं राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, काहीही झालं तरी आमचं सरकार पाच वर्ष पुर्ण करणार. पुढील निवडणुकीत पाहू की कोण पडतं ते लोक ठरवतील, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या –
Russia-Ukraine War | युद्ध आणखी भडकणार?, ‘या’ देशाची युक्रेनला मोठी मदत
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…