“कर्णपिशाचांच्या नादी लागू नका, उरलं सुरलं भाजप संपून जाईल”

मुंबई | राज्यात सध्या जोरदार राजकीय वातावरण रंगलं आहे. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्द्यांवरून वाद पेटला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या महाविकास आघाडीवरील टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

नड्डा यांनी महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करण्याचं आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं. यावेळी नड्डा यांच्यासोबत महाराष्ट्र भाजपचे नेते उपस्थित होते.

नड्डा यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपच्या काही कारस्थानी लोकांनी नड्डा यांच्या कानात काही सांगितलं असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जे. पी. नड्डा यांनी या कर्णपिशाचांच्या नादी लागू नये. अन्यथा उरलं सुरलं भाजप सुद्धा संपून जाईल. भाजपमध्ये अनेक कपटी कारस्थानी लोक आहेत. नड्डा यांनी त्यांच्या नादी लागू नये, असं सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजपला आम्ही फार जवळून पाहिलं आहे. आम्ही सोबत राहिलेला भाजप आणि आजचा भाजप यामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आजच्या महाराष्ट्र भाजपला कोणत्या भुतानं झपाटलंय ते पहावं लागेल. त्यांचं हे भुत जनता 2024 च्या निवडणुकीत नक्की उतरवणार आहे.

जेपी नड्डा यांनी आपल्या भाषणादरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील भाष्य केलं आहे. नड्डा यांच्या भाषणावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तरी महाविकास आघाडी सरकारला काहीच होणार नाही, असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राऊत यांनी एऩसीबीच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. एनसीबीचे अधिकारी पावग्राम गांजा पकडून गावभर गोंधळ करतात. तिकडं गुजरातमध्ये करोडोंचा गांजा सापडत आहे यावर काही करवाई करणार का नाही, असा सवाल यावेळी राऊत यांनी एनसीबीला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“नवाब मलिक हा गद्दार, त्याला पाकिस्तानला पाठवा”

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी

बहुप्रतिक्षित ‘Maruti Suzuki Celerio’ उद्या बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

खवय्यांना महागाईचा दणका! हाॅटेलचं जेवण तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार