मुंबई | महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना हा नवा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष आता दिवसेंदिवस वाढत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतूरा रंगला आहे.
केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून आम्हाला त्रास देत आहे. ईडीच्या कारवाईत सातत्यानं वाढ होत असल्याचं राऊत यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. परिणामी आता गोंधळ निर्माण झाला आहे.
संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जहरी टीका केल्यानंतर आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
नारायण राणेंनी संजय राऊत यांचा उल्लेख सध्या शिवसेनाप्रमुख असल्याचा केला आहे. संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची जागा घ्यायची आहे. परिणामी राऊत असं करत आहेत, असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.
नारायण राणेंच्या टीकेला आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. होय मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त आहे. आमचा कुठेही डोळा नाही, आमचा फक्त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे, असं राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात आणि देशात शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचलेली असेल. बरेचसे लोक तोपर्यंत बेरोजगार झालेले असतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, नारायणे राणेंनी संजय राऊत यांनी ज्या प्रकारची भाषा पत्रकार परिषदेत वापरली त्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. शिवसेना आणि भाजपमधील वाद काहीकेल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयं.
महत्त्वाच्या बातम्या –
“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”
Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”