“राज ठाकरेंना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच भोंग्याचा त्रास सुरू झाला”

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात तीन सभा घेत आक्रमक हिंदूत्वाच्या मार्गानं जाणार असल्याचं दाखवलंय. त्यानंतर राज्यात बराच गोंधळ झाला आहे.

राज्य सरकार आणि मनसे-भाजपमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे. राज ठाकरेंनी राज्यातील सभानंतर आता अयोध्या दौरा जाहीर केला आहे. त्यावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या 15 वर्षात यांना हनुमान चालीसाचा त्रास झाला नाही , असं राऊत म्हणाले आहेत.

15 वर्ष त्रास झाला नाही मात्र आता भाऊ मुख्यमंत्री होताच यांना भोंग्याचा त्रास सुरू झाला. हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

तुम्ही भोंग्याचं राजकारण सुरू केलं. ज्यांनी जिवंतपणी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं, ज्यांनी बाळासाहेबांना यातना दिल्या ते आता बाळासाहेबांबद्दल  बोलत आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत.

आज लोकं पेटवा-पेटवीची भाषा करत आहेत. सवाल ये नही की आग कैसै लगी सवाल यह है की बंदर के हात माचीस किसने दी, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची आठवण काढून देत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावरून राऊतांनी राज ठाकरेंना चांगलंच सुनावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 भोंग्याच्या वादावर केंद्रीय मंत्र्याची राज ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले…

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर 

“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”

सेक्स लाईफबाबत दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य, म्हणाली…