मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक जरी फोन केला असता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती टिकली असती, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या बाजुने कौल दिला होता. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेमध्ये बिनसलं. शिवसेनेनं वेगळा मार्ग पकडत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली व राज्यात सरकार स्थापन केलं आहे.
पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती. त्यातून काही मार्ग निघाला असता. मात्र, दोघांनीही चर्चा न करण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला वेगळं व्हावं लागलं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी सामना अग्रलेख, ट्विटर सत्र आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
महाआघाडी सरकारची आज अग्निपरिक्षा; 170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा – https://t.co/McI9g3kDrF @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर त्यांनी भाजपसोबत या” – https://t.co/RoVaPbgN7Y @RamdasAthawale @AjitPawarSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“जोगेंद्र कवाडेंना मंत्रिपद मिळावं हीच आंबेडकरी जनतेची इच्छा” https://t.co/2Oa43Muqer #jogendra_kawade
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 29, 2019