नवी दिल्ली | तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बिपीन रावत यांचा काल हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अनेक रहस्यही संपली आहेत, असं सांगतानाच रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे देशातील सर्वोच्च नेतृत्वही गोंधळलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
रावत यांच्या अचानक अपघाती जाण्याने देश आणि सरकारही गोंधळलं आहे. हा अपघात घडला तेव्हा आम्ही संसदेच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करत होतो. आमचे आंदोलन सुरू असतानाच ही बातमी आली. त्यावेळी तिथेही हाहा:कार माजला, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
या दुर्घटनेमागे घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, तसा अंदाज व्यक्त होत आहे. पण हा राजकीय विषय नाही. हा देशाचा विषय आहे, असं राऊत म्हणालेत.
बिपीन रावत यांच्याशी अनेकवेळा संवाद साधण्याचा योग आला. ते लष्करी रुबाब बाजूला ठेवून बोलत असत. संवाद साधत असत. त्यामुळे ते प्रत्येकाला आपले वाटत होते. या घटनेनंतर देशातील सर्वोच्च नेतृत्वही गोंधळले असतील, असंही संजय राऊत म्हणालेत.
सीमेवरच्या सामान्य सैनिकांपर्यंत त्यांचा संवाद होता. अनेक किचकट आणि तांत्रिक विषय त्यांनी संरक्षण समितीत सांगून आमचा गोंधळ आणि शंका दूर केल्या. सर्व पक्षीय नेते या समितीत असतात. त्या सर्वांच्या शंकाचं निरसन केलं होतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जनतेच्या मनात काही शंका असेल तर ती समोर आली पाहिजे. त्यावर संसदेत चर्चा झाली आणि बोलण्याची संधी मिळाली तर आम्ही चर्चा करू, असंही ते म्हणाले. लष्कराची रहस्य असतात. त्यावर चर्चा करू नये असे संकेत असतात. चीनचं संकट असताना आमच्या सेनापतीने जावं दुर्देवी घटना आहे, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळण्याआधीचा पहिला व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ
अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर
‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं?
“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”
‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल