संजय राऊतांच्या ‘या’ दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ

मुंबई | महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याता दावा भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांना 25 नाही तर 175 आमदार आमच्या संपर्कात आहेत असे बोलायचे असेल. स्पीप ऑफ टंग झाली असेल, आहेत संपर्कात तर घ्या ना, थांबलाय कसासाठी? असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.

उद्या मी म्हणतो भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असंही राऊत म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे भांग तर पीत नाहीत, माझे चांगले मित्र आहेत ते, दिल्लीत ते माझ्या बाजुला राहतात. मात्र त्यांनी हा दावा कोणत्या नशेत केला? असा सवाल संजय राऊतांनी केला

दरम्यान, दानवेंच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. कारण या दाव्यावरून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आता दानवेंचा समाचार घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

माही दा नंबर सात! धोनीनं सांगितलं आपल्या जर्सी नंबरचं ‘ते’ रहस्य 

 “मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, माझ्या इमेजचा फायदा…”

 आप करणार बेरोजगारी साफ! पंजाब सरकारनं युवकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

 नारायण राणेंच्या अडचणीत पुन्हा वाढ; BMCनं दिला ‘हा’ मोठा दणका

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये