“आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल”

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केली. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केली आहे.

अनिल देशमुखांवर झालेल्या कारवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राऊतांनी यावेळी बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांनी खुशाल उड्या माराव्यात. एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल, असं म्हणत राऊतांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

त्यांना घरातच बाथरुममध्ये तोंड लपवून बसावं लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतो, असा इशारा संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे, असं राऊतांनी म्हटलंय.

काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावं लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा देतानाच पण करायचं का आम्ही? तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? हे क्रुर लोकं आहेत. राक्षस गणातील लोकं आहेत. हे हिंदुत्वाचे नाव घेतात. पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाहीये, अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. 2024 नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका, असं राऊत म्हणाले.

तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या –

खबरदार, माझ्या अंगावर कोणी आलं तर सोडणार नाही- अमृता फडणवीस 

राष्ट्रवादीला गेल्या दोन दिवसात लागोपाठ दुसरा झटका, आता ‘या’ मंत्र्याची संपत्ती होणार जप्त

“…तर मी फोटोग्राफी केली असती आणि फडणवीसांना प्रदर्शनाला बोलावलं असतं”

पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटलं आहे- किरीट सोमय्या 

मी सरळमार्गाने आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती- अनिल देशमुख