नवी दिल्ली | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनाची पुढची रणनिती ठरवण्यासाठी थोड्याच वेळात बैठक सुरु होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
हा देश अखंड राहावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. हा बाबरी पाडल्याचा दिवस नाही. तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्याचा दिवस आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊतांनी यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकप्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या प्रांगणात अशा प्रकारचं कृत्य होणं याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी माहाराड, बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असे अनेक युगपुरूष आहेत. जे महाराष्ट्राने देशाला दिले आहेत. त्यांच्याविषयी लिखाण करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. कारण लोकांच्या भावना या युगपुरूषांशी जोडलेल्या आहे, असंही राऊतांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही लिखाण आणि वक्तव्य केल्याबद्दल पंडित नेहरुंनाही माफी मागावी लागली होती. मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती, असं राऊतांनी यावेळी बोलताना सांगितलं.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचं वेडंवाकडं, महाराष्ट्रात खपवून घेतलं जात नाही, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.
दरम्यान, आपण कितीही हुशार असलो, विद्वान असलो तरी आपल्याला भान असलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात Lockdown लागणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य…
Omicron | ‘कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…’; धक्कादायक माहिती समोर
“गिरीश कुबेर आपल्या पुस्तकातून शरद पवारांपेक्षा फडणवीस श्रेष्ठ असल्याचं मांडताना दिसतात”
Omicron चे रुग्ण आढळल्यानंतर पुणे प्रशासन लागलं कामाला; घेतला हा निर्णय
साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक!