नागपूर महाराष्ट्र

“पंतप्रधानांना 2 तासही झोपू द्यायचं नाही, हे भाजप नेत्यांनी ठरवलंय”

Devendra Fadnavis And Pm Modi in Nashik Sabha

नागपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 तास काम करतात, दोन तास झोपतात, आता तर ते दोन तासही झोप येऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.

मोदी साहेब खूप काम करतात, ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. मात्र आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचं नाही असा बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवलेले आहे, त्यानुसार भाजपचे नेते कामाला लागले आहेत, असा टोला राऊतांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

संजय राऊत तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी आले आहेत. नागपुरात आल्यावर त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षाचा विस्तार कोकण व्यतिरिक्त भागात झाला नाही, ही टीका होत असताना आता शिवसेनेनं पक्ष विस्तारासाठी तयारीला लागलीये.

विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर, शिवसेनेचे सर्व खासदार आता पुढचे तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भ पिंजून काढणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

coronavirus update: राज्याला मोठा दिलासा! आज एकही मृत्यू नाही; कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट

काँग्रेसला मोठा झटका?, ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

 दाद्या मारायलाय…! शंकरपाळ्यानंतर आता महाराष्ट्राला वेड लावणारं बारकाल्या पोरांचं भांडण व्हायरल

NCC उमेदवारांसाठी खुशखबर! पोलीस भरतीसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली