मुंबई | भाजपमध्ये तुमच्यासाठी कोणी साखरेची गाठ आहे का?, असा प्रश्न संजय राऊत यांना प्रश्न विचारला. यावर राऊतांनी आमच्यासाठी भाजपमध्ये गुळाचं पोतंच आहे. सगळे गोडच आहे, असं म्हटलंय.
भाजपमध्ये सगळेच जवळचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांची यावेळी संजय राऊत यांनी नावे घेतली. दरम्यान, मी जर बोललो नाही तर अनेक विरोधकांची राजकीय दुकानं बंद होतील असेही राऊत म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांची नावं संजय राऊत यांनी यावेळी घेतली. मी जर बोललो नाही तर अनेक विरोधकांची राजकीय दुकानं बंद होतील, असंही राऊत म्हणालेत.
भांडण हे विचारांचं असायला हवं. व्यक्तिगत शत्रूत्वाने जर तुम्ही भांडणं करायला लागला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसेल. अगदी यशवंतराव चव्हाण ते बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांपर्यंत कधीही सुडाचं राजकारण केल्याचं दिसतंय, असं ते म्हणाले.
राज ठाकरे आज अयोध्येला जाण्याची घोषणा करु शकतात, यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की, राम सर्वांचा आहे. जायला हवं, असं ते म्हणालेत.
प्रत्येक समाजाचे आहेत. हिंदूचे आहेत, मराठी माणसाचे आहेत. प्रत्यकाने त्यांच अनुकरण केले पाहिजे, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव, म्हणाले…
Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या- सुप्रिया सुळे
सर्वात मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू
‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश; लाखाचे झाले ‘इतके’ कोटी