“महाविकास आघाडीची एकजूट किती आहे हे संध्याकाळी समजेल”

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिलं मत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी नोंदवलं. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीची एकजूट किती आहे हे संध्याकाळी समजेल. तसेच महाविकास आघाडी सर्व उमेदवार निवून येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र आम्ही पुढे घेऊन जाऊ असंही राऊत यावेळी म्हणाले. आजची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे, मंत्री बाळसाहेब थोरात या सर्व नेत्यांमध्ये संवाद असल्याचं राऊत यांनी सांगितलंय.

आमदार पक्षाच्या कँम्पमध्ये असतानाही दाब दबाव धमक्यांचे निरोप सातत्यानं येत होते. पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ही लोकशाही असल्याचे राऊत म्हणाले. लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही या सगळ्यांवरती मात करु, असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

आजच्या निवडणुकीत एका आमदाराच्या मताला महत्व आहे. यासाठीच मतं गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही, कारण…” 

‘पक्षादेश पाळणं आमच्या रक्तातच’; आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना 

“तोडफोडीमध्ये सहभागी झालेल्यांना सैन्य दलात घेणार नाही” 

“काही खोटारडी लोकं मनाला वाटेल तसं बोलत असतात” 

“आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे”