“Mamata Banarjee यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं”

मुंबई | तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही. ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटलं, असं राऊत म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी बंगालात प्रचंड विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आणि मत्ता यांचा दारुण पराभव केला. एखाद्या वाघिणीसारख्याच त्या लढल्या. केंद्रातले मोदींचे सरकार कसे छळवाद करीत आहे व बंगालचे सरकार व जनता या छळवादाशी कसे नेटाने लढत आहे ते त्यांनी सांगितल्याचं राऊत म्हणाले.

ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. तेव्हा गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाल्याचंही संजय राऊत म्हणाले.

देशाचा आर्थिक भार मुंबईच्या (Mumbai) डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल, असंही संजय राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केलं आहे.

‘ईडी’चे पन्नास लोक कोलकात्यात बसवून ठेवले आहेत व ते मंत्री, आमदारांवर खोटे गुन्हे दाखल करतात. प. बंगालची यथेच्छ बदनामी भाजप व केंद्रीय यंत्रणा करतात, पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही. मराठा व बंगाली हे लढणारे लोक आहेत. ते मागे हटणार नाहीत, असं बॅनर्जी यांनी म्हटलंय.

दरम्यान,

महत्त्वाच्या बातम्या- 

सावधान! ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका 

“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल” 

‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख 

“…तर राज्यात Lockdown करावं लागणार” 

 “काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”