महाराष्ट्र मुंबई

जागावाटपाबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलू नये- संजय राऊत

मुंबई : सेना-भाजपमध्ये आधीच मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटता सुटेना. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचं म्हणाले होते. त्यावर संजय राऊतांनी आपलं मत मांडलं आहे.

जागावाटपाबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलू नये, जागावाटपाबद्दल कोणताही तिढा बाकी राहिला नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दोन पक्षांमध्ये कोणतेही मतभेद उरलेले नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही वाद नाही, असं राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

महाराष्ट्रात नेमकं काय करायचं याचा निर्णय शिवसेना नेहमी स्वतंत्रपणे घेत असते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचं वाटप समसमान होईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाध्यक्ष अमित शहा, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सूरात बोलले होते. आता सूर बिघडणार नाहीत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. 

महाराष्ट्राचं नेतृत्व आदित्य यांनी करावं ही जनभावना आहे आणि महाराष्ट्रातील लोकांची ती सुप्त इच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-…अन् पिडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधींनी अख्खी रात्र जागून काढली!

-आम्ही दोघी संसदेत का हसलो???, अखेर रक्षा खडसेंनी सांगितलं कारण

-युतीत बंडखोरीची शक्यता; परभणीत भाजपला हव्यात शिवसेनेच्या जागा

-“नारायण राणे या मतदारसंघातून लढणार”

-दोघी खुदकन हसल्या अन् टेबलामागे दडल्या; सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु

IMPIMP