मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी ईडी कार्यालयाने नोटीस पाठवली आहे. त्यावरुन मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर झाले आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाठराखण करत राज ठाकरेंना पाठिंबा दिल्याचा पाहायला मिळाल्याचं पाहायला मिळालं.
मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज ईडी कडून चौकशी सुरू आहे. यावरच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आम्ही सतत भांडत असतो. पण कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठीशी आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्ही राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
इडी नोटीस हे संकट नाही तर ही प्रोसेस आहे. मला वाटत नाही या चौकशीमधून काहीही बाहेर येईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंना ईडीची नोटीस जरी आली असली तरी मला त्यातून काही निघेल असं वाटत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या-
-मी नक्की कुठे??? निर्णय येत्या 10 दिवसात- नारायण राणे
-कसोटीला मालिकेला आजपासून सुरूवात; सलामीला कोण?
-औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी!