आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आमचे चारही उमेदवार विजयी होतील- संजय राऊत

मुंबई | आज सांयकाळी सात वाजता राज्यसभा निवडणुकीबाबतचं चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

भाजपकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आमच्या ठरलेल्या गणितानुसार मतं मिळतील आणि आमचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना घटनेनं मतदानाचा अधिकार दिला आहे. तरीही त्यांना अधिकार मिळत नाही. या लोकशाहील नवीन कोणी मालक निर्माण झालं आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या मतदानात हे आकडे आपल्याला स्पष्ट दिसतील असं राऊत म्हणाले.

दोन शिवसेनेचे, एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असं राऊतांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-  

MIM चा पाठिंबा कोणाला?; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट सांगितलं 

“…तर आम्ही काही बांगड्या घातल्या नाहीत, बाकी काही पेटलं तरी चालेल” 

‘या’ आमदाराने शिवसेनेचं टेंशन वाढवलं; पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर 

“देश नही झुकने दुंगा विसरलात का?, भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा” 

खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह