मुंबई | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार केलेल्या छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास आपण उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका घेतली आहे.
दोन्ही उमेदवार शिवसेनेचाच असणार हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय असून राज्यसभा दोन्ही जागांसाठी पुरेसं नाही तर जास्त संख्याबळ असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही. राज्यसभेच्या 2 जागा शिवसेना लढवणार आणी जिंकणारच असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश नाही केला तर शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं. मात्र संभाजीराजे शिवसेनेचं निमंत्रण फेटाळलं. तसेच संभाजीराजे शिवसेनाच काय तर कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही, अशी माहिती समोर आलीये. तसेच ते वर्षावर जाणार नसल्याचं कळतंय.
संभाजीराजेंना विरोध राजकीय दृष्टा न परवडणारा असल्याने आमदारांनी पक्ष नेतृत्वाकडे विरोध न करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संभाजीराजे यांच्याकडून मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे संभाजीराजे अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”
‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले
‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका
‘अमरावतीची भाकरवडी’ म्हणत दीपाली संय्यद यांचा नवनीत राणांवर घणाघात, म्हणाल्या…
“अजित पवार आज सत्तेत आहेत उद्या नसतील, पण फडणवीस सत्तेत आल्यावर…”