मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीतील मेळाव्यात शरद पवार (Sharad Pawar) यांना UPA चं अध्यक्षपद देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीये.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे.
शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. मी UPA बाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणार, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
UPA कुणाची खासगी जागीर नाही. भाजप विरोधात ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. केजरीवाल प्रयत्न करत आहेत. शरद पवार एक भीष्म पितामह आहेत. काँग्रेसकडून मात्र कुठलीही जबाबदारी दिसत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकिल सतीश उके यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. यावरही राऊतांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.
जिथं भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तिथं कायदा समान नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झुंडशाही आणि अराजकता पसरवत असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. ईडीचा वापर पाळलेल्या गंडुसारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचं राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात सातत्याने कारवाई केली जात आहे. खरं म्हणजे हा एक गंमतीचा विषय आहे. आता चितेंचा विषय राहिलेला नाही. चिंता करावी असा विषय राहिलेला नाही. तर गंमत करावी आणि गंमत पाहावी असा विषय झालेला आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा
‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
“राऊतांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”