“शरद पवारांशिवाय तगडा उमेदवार देशात उरलाय का?”

मुंबई | राष्ट्रपती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखा तगडा उमेदवार विरोधी पक्षांकडे आहे का?, असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी 6 महिन्यांपूर्वीच तयारीला सुरुवात करायला हवी होती. मात्र आता उशीर झाला असल्याची खंत देखील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

शरद पवारांनी निवडणुकीसाठी होकार दिला असता तर निवडणूक रंगतदार झाली असती. राष्ट्रपती निवडणुकीत आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत आणि खासदारांच्या मतांचे मुल्य सर्वाधिक असते. त्यामुळे भाजप मजबूत स्थितीत असला तरी ही निवडणूक केवळ खासदारांच्या मतांवर जिंकता येत नाही, असं  राऊतांनी म्हटलंय.

महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्ये हे भाजपविरोधी आहेत. त्यामुळे शरद पवार निवडणुकीस उभे राहिले असते तर भाजपविरोधी सर्वांनी आपली मते शरद पवारांच्याच पारड्यात टाकली असती, असं संजय राऊत म्हणाले. मात्र यासाठी आम्ही 6 महिने आधीच तयारी सुरु करायला हवी होती, असंही राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा या देशातील विरोधी पक्ष नेत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही एक प्रक्रिया असते. सगळ्या देशाला मान्य होईल अशा प्रकारची व्यक्ती तिथे बसायला हवी. पण सत्ताधारी पक्षातील एक नेता तिथे पाठवला जातो आणि तो कार्यकर्ता म्हणून बसतो. पण तरीही सगळ्यांना मान्य होईल असं नाव आलं तर त्यावर चर्चा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी! 

सर्वात मोठी बातमी; वाढत्या विरोधानंतर अग्निपथ योजनेत सरकारने केला मोठा बदल 

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; ‘त्या’ चिठ्ठीने पुण्यात खळबळ 

“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवार तर…”

देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले…