मुंबई | मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं. स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. न्यायदेवतेला सन्मान होईल. फायर टेस्ट (Fire Test), ही अग्निपरीक्षेची वेळ आहे. हे दिवस पण निघून जाईल, असं म्हटलं आहे.
ठाकरे जिंकले जनमानस देखिल जिंकेल. भव्य विजयाची ही सुरुवात आहे, लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ. मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने 39 आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावं असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली. त्यासोबतच त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक, म्हणाले ‘या दलाल नेत्यांवर थुंका’
आता महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता जाणार शिंदे गटात
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं
सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका, उद्या बहुमताची चाचणी होणार