“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राऊतांनी शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांची भेट यावर भाष्य केलं आहे.

शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक आहेत, असंही राऊत यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये असं नाही. कारण शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही, असं त्यांनी म्हटलंय.

राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा देखील हा विषय समोर आला होता. देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.

शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक आहेत, असही राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांना इतकं गांभीर्यानं का घेता, असं राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना इतक गांभीर्यानं का घेताय? त्यांची वक्तव्य नैराश्यातून येतात, असं संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना इतकं गांभीर्यानं का घेता? तम्ही देखील त्यांना गांभीर्यानं घेत जाऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल. माझी उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ 

Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड 

“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार” 

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर 

Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला