“एवढं नक्की सांगतो, पुढच्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील संसदेत असतील”

पुणे | शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आढळराव पाटील यांच्यातील राजकीय संबंध वाद सर्वांना माहितीये.

लोकसभेपासून दोघांमधील दोघेही एकमेकांवर अनेकदा टीका करताना पाहायला मिळालेत. आता दोघांमधील हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. याचं कारण आहे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांचं वक्तव्य.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिरुरमध्ये जाऊन खासदारकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे शिरूरमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

माझा आत्मविश्वास तुम्हाला माहीतच आहे इकडची दुनिया तिकडे करू, हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजी आढळराव पाटील संसदेत जाणारच, असं संजय राऊत यांनी ठासून सांगितलं आहे.

आता महाविकास आघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत. जी माझ्या तत्वात बसत नाहीत, नाहीतर हा राऊत गप बसला असता का?, असा सवाल ही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला

आपल्याकडे इथं खासदार आणि आमदार नाहीत. म्हणून उमेद हरवू नका. कारण आज नाहीत म्हणजे उद्या नसणार असं नाही. हे लक्षात असू द्या. कारण हे राजकारण अन मतदार ही चंचल असतात. गंगुबाई काठेवाडी सिनेमा पहा, आम्ही सिनेमे फार पाहतो असही, असंही संजय राऊत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास 

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता

“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…”