मुंबई | सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमावरून बरीच चर्चा सुरू आहे. अनेक राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे.
भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभेतही ही मागणी केली होती. या मागणीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘द कश्मीर फाइल्स’चं काय घेऊन बसलात? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरही ‘ठाकरे’ हा सिनेमा आम्ही बनवला आहे, तोही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही. आम्ही अशी मागणी कधीही केली नाही, असं राऊत म्हणाले.
आता त्यांना काश्मीर आठवलं आहे. मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असं बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही, असं राऊतांनी सांगितलं.
काश्मीर प्रकरणावर आम्ही कधी राजकारण केलं नाही. दहशतवादी अमरनाथ यात्रेत धमकी देत होते. तेव्हा केंद्र सरकार कुठे होते. बाळासाहेब पहिले नेते होते, त्यांनी असा इशारा दिला की, तेव्हा कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे विमान साधे हजपर्यंत उडणार नाही, अशी धमकी दिली. द काश्मीर फाइल्स चित्रपट कसा बनला, याबाबत मला सगळी माहिती आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
सध्या लोकशाहीचं भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरून राजकारण करू नये. आम्ही ठाकरे चित्रपट बनवला. मात्र, तो सुद्धा टॅक्स फ्री केला नाही, असं संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका
सोनिया गांधींकडून डॅमेज कंट्रोल; उचललं हे मोठं पाऊल
31 मार्चच्या आत करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका
जो बायडन यांचा रशियाला झटका; केली ‘ही’ मोठी घोषणा
मोठी बातमी! अजित पवारांकडून आमदारांना होळीचं मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय