Top news महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! यूपीएत जाण्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray Sanjay Raut01 e1598517943331

मुंबई | युपीएत जाण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते दिल्ली माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेत्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या भेटीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक आहेत, असं सांगत संजय राऊत यांनी संस्पेन्स कायम ठेवला आहे.

मी पक्षाचा शिवसैनिक आहे, त्यामुळे इकडे बसून जे काय करतो ते त्यांच्या आदेशानं करत असतो. घडामोडी ज्या घडतात ज्यात आम्ही सहभागी होत असतो ती उद्धव ठाकरेंना देत असतो, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं काय म्हणनं आहे ते सांगतिलचं ना, ते लवकरच तुमच्याशी संवाद साधतील. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, लहान घटक पक्ष यांच्या साथीनं सरकार चालवतो. हा मिनी यूपीएचा प्रयोग हा क्रांतिकारक आहे. देशात याची चर्चा सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

शरद पवार यांच्याशी काल माझी चर्चा झाली. राहुल गांधी यांना भेटण्यापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत. निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. त्यांना आमच्याशी एका विषयावर चर्चा करायची असेल तर आमचं ते कर्तव्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, यूपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे हे सगळ्यांचं म्हणनं आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी एका चांगल्या भावनेनं सांगितलं आहे, असं राऊत म्हणालेत.

जेव्हा आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी, हा फ्रंट तो फ्रटं, गट तट असं न करता जी आघाडी आहे ती मजबूत करायला हवी, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही” 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ 

Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड 

“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार” 

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर