शिवसेना NDA तून बाहेर पडलो असली, तरी…; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडलो असलो, तरी सध्या आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत(यूपीए) नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते ‘हिंदुस्तान टाईम्स’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधी नव्हते. याविषयी विचारले असता, आम्ही विरोधकांसोबत का जाऊ, संसदेत आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

यापुढेही असे प्रसंग येतील जेव्हा आमची भूमिका महाविकास आघाडीपेक्षा वेगळी असेल. आम्ही मागेही काही बाबतीत स्वतंत्र भूमिका घेतली आहे आणि पुढेही घेत राहू, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आलं आहे. त्याआधी शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली हे स्पष्ट झालं होतं.

महत्वाच्या बातम्या-