संजय राऊतांनी केला योगी आदित्यनाथ भेटीसंदर्भात मोठा खुलासा!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत शिवसेना खासदार राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. तसेच आदिनाथांशी मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याची माहिती राऊतांनी ट्विटवरून दिली आहे.

सात मार्चला उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या प्रस्तावित दौऱ्याबाबत राऊतांनी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आदित्यनाथ यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला अयोध्येतील साधू-संतांनी विरोध केला आहे. हनुमानगढीचे पुजारी महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अयोध्येत मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-कोरोनापासून बचावासाठी नवनीत राणा मास्क घालून पोहोचल्या संसदेत!

-सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा; काढली थेट लायकी!

-अण्णा हजारे यांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात म्हणतात…

-दाभोळकर हत्याप्रकरणातील ‘हा’ मोठा पुरावा सापडला सीबीआयच्या हाती!

-…म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना केलं निलंबित!