मुंबई पोलिसांना न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर असताना रोखलं हे बरोबर नाही- संजय राऊत

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने काल सुशांत सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. निकाल सीबीआयकडे पाठवल्यानंतर अनेकांनी आपला आनंद सोशल माध्यामांवर व्यक्त केला. मात्र मुंबई पोलिसांसोबत बरं केलं नसल्याचं खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचा. कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखलं हे बरोबर नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

डीजीपींना झालेला आनंद पाहून त्यांनी केवळ हातात भाजपचा झेंडा घेणं बाकी होतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बिहारचे डीजीपी म्हणाले, हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय आहे. याच वक्तव्यावरून राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवलं तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाइन करण्यात आलं. यावरुनच लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळालं. न्यायालयाच्या निर्णयामुळे 130 कोटी जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयायबद्दल असलेली आस्था अजून दृढ झाल्याचं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता…! कांदा एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा

रिया आणि सुशांतच्या नात्याची सुरुवात कशी झाली?; रियाने सांगितली ‘लव्ह स्टोरी’

भाजपचा कॉंग्रेसला मोठा झटका! कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

धोनीचं करियर कोणी संपवलं?, चहलनं सांगितलं नेमकं कारण; म्हणाला…

‘आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’; भाजपचा आक्रमक पवित्रा