मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप सरकारने इथे खोदकाम करण्यापेक्षा चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर हस्तगत करून दाखवावं, असं संजय राऊत म्हणालेत.
कैलास मानसरोवर, जे शंकराचं स्थान आहे, ते चीनच्या ताब्यात आहे. आमचे शिवजी तिकडे तपाला बसले आहेत. तुम्ही खरे हिंदुत्वावादी असाल तर चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवा, असं आव्हान संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना दिलं आहे.
भाजपकडून या माध्यमातून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. दंगली पेटवून निवडणुका लढवणं दोन्ही बाजूंनी टाळायला हवं, असंही संजय राऊत म्हणालेत.
फडणवीसांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांवर मी का उत्तरं देऊ? ते एवढे मोठे कोण लागून गेले आहेत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना आम्ही फार महत्त्व देत नाही. आमच्या लेखी संजय राऊत हा फार महत्त्वाचा माणूस नाही, अशी खोचक टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“कुठेही दगड ठेवा अन् त्याला लाल रंग लावा, लगेच मंदिर तयार होतं”
“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् चाकरी दुसऱ्यांची करायची”
गुजरातमध्ये काँग्रेसला जोर का झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
सहाव्या राज्यसभा जागेवरून संजय राऊतांचा इशारा, म्हणाले…
“जगू द्याल की नाही?”; राज ठाकरेंचा संतप्त सवाल