मुंबई | आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी लोकांकडून जमा केलेला निधी किरीट सोमय्यांनी हडप केला. देशासाठी बलिदान करणाऱ्यांचा असा अपमान करणाऱ्या किरीट सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चार जोडे हाणले पाहिजे, अशी बोचरी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे. मात्र, देशभक्तीचे गीत गाणारे, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्यांची बाजू घेतली, असं त्यांनी सांगितलं.
फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय गोळवलकर गुरुजी, देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. मोहन भागवत यांनादेखील वाईट वाटत असेल असंही राऊत यांनी म्हटलंय.
किरीट सोमय्या यांनी सुरु केलेल्या मोहिमेला लाखो मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. यातून 57 कोटी रुपये तेव्हा जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ही रक्कम राजभवनात जमा करू, असं किरीट सोमय्या म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम राज्य सरकारकडे देण्यात आलेली नाही. वीरेंद्र उपाध्याय या माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीवरून नुकतचं हे प्रकरण उघडकीस आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
तसेच या कार्यकर्त्याला राज्यपालांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटलंय की अशा प्रकारची रक्कम राज्य शासनाकडे आलेली नाही, मग ही रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली आहे. निवडणुकीवर आणि स्वतःच्या मुलाच्या कंपनीवर त्यांनी ही रक्कम खर्च केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लाखो-करोडो मुंबईकरांच्या भावनेशी हा खेळ असून हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार”
खळबळजनक! ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप