मुंबई | राज्यातील सुरू असलेल्या ईडीच्या कारयवायांवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची चर्चा जगभर सुरू आहे. आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय. तसेच सध्या देशाचं वातावरण बदलून गेलंय, असं संजय राऊत म्हणालेत. ते लोकमतच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हीही मी येईल. बाजूला बसेल. पुढच्या वर्षी लोकमतच्या कार्यक्रमात येईल, असा टोला राऊतांनी यावेळी फडणवीसांना लगावला आहे.
दरम्यान, सकाळी आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे. काल पाटणकरांवर कारवाई केली. त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घ्या, असं राऊत म्हणाले होते.
चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही, असंही राऊतांनी म्हटलं होतं.
मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
Corona Virus | कोरोनाच्या नव्या Omicron BA-2 व्हेरिएंटचं पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा
“सतेज पाटील हा माणसं खाणारा माणूस, विरोधकांनो सावध राहा”
Corona | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ; राज्य सरकारनं उचलंल मोठं पाऊल