“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”

नाशिक | शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. प्रत्येकाला काळजी घेण्याचं आवाहन संजय राऊतांनी केलंय. यावेळी बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

शाची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं ऐकते. मी स्वत: देखील त्यांचं अनुकरण करतो. ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही मास्क लावत नाहीत. लोकही मास्क लावत नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क लावा सांगतात, पण ते मास्क लावत नाहीत. मुख्यमंत्री मास्क लावतात, पण देशाचे नेते मोदी आहेत. आपण पंतप्रधानांचं ऐकतो, मी सुद्धा त्यांचं अनुकरण करतो, असं राऊत म्हणाले.

जागतिक व्यासपीठावरील किंवा देश पातळीवरील कुठल्याही कार्यक्रमात मोदी मास्क लावत नाहीत. म्हणून लोकही लावत नाहीत. लोकांना विचारलं तर ते मोदींकडं बोट दाखवतात. त्यामुळं मोदींनी देखील मास्क वापरायला हवा. त्यांनी स्वत:पासून बंधनांचं पालन करावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यात सध्या रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू झाली आहे, पण दिवसा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये असं वाटतं. तसं झाल्यास नोकरी, धंद्यावर संकट येईल. राज्याचं अर्थचक्र थांबेल. तसं होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन (lockdown) लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत.

दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ लॉकडाऊनबाबत निर्णय घेईल, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अखेर अटक! 

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

‘कोरोनाची त्सुनामी येणार आणि…’; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं  

कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर 

“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…”