मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडाळी केली व शिवसेनेला सर्वात मोठा धक्का दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पडले व राज्यात शिंदे सरकार सत्तेत आलं.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आम्हीच खरी शिवसेना असा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी धक्कासत्र कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचं नाव व निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा ठोकल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेनेच्या कार्यालयावर देखील दावा केला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करतील एवढे ते हवेत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तर त्यांना शिवसेना भवन, सामना वृत्तपत्र व मातोश्रीवर देखील ताबा मिळवायचा आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.
एक दिवस फुटीर गट जो बायडनचे घर देखील ताब्यात घेईल. कारण त्यांचा मोठा पक्ष झाला आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
बाळासाहेबांचा मूळ पक्ष आमचाच किंबहूना बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलं आहे. उद्धव ठाकरेंना आम्हीच पक्षप्रमुख केलं आहे असं सांगायलाही ते कमी करणार नाहीत, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. तर लोकशाहीची एवढ्या उघडपणे कोणी हत्या करू शकत नाही त्यामुळे आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार?, आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी
संजय राऊत हाजीर हो! राऊतांना ईडीचा तिसऱ्यांदा दणका
“पूर्वीचे सुलतान मंदीरं पाडायचे आणि आताचे सुलतान शिवसेना पाडत आहेत”
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ईडीचा मलिकांना आणखी एक झटका
“प्रलोभनाला आम्ही कुत्र्यासारखे टांग वर करून दाखवतो अन् दबावाला…”