“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला, तरी आम्हीच जिंकू”

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) मोठा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीत झालेल्या मतांची मोजणी करण्यास परवानगी दिली नसल्याचे पुढे आलं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला!!
आम्हीच जिंकू, असं संजय राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान,राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमधीलही राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रात जे घडतंय अगदी तसंच काहीसं हरियाणामध्ये घडताना दिसत आहे.

महाराष्ट्रात भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ते तीन मतं बाद करावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील पत्र पाठवलं आहे.

हरियाणामध्येदेखील भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज्यसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याची तक्रार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट 

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं आणि…” 

Rajyasabha Election | गुलाल आम्हीच उधळणार- उद्धव ठाकरे 

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; केली ‘ही’ नवी घोषणा 

“हवेत उडणाऱ्या भाजपच्या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल”